सध्या कलर्स मराठी वाहिनीवर ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे तिसरे पर्व सुरु आहे. कार्यक्रमातील विविध वयोगटातील गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. या आठवड्यातील भागामध्ये देखील असेच काहीसे घडले. सध्या प्रसाद ओक दिग्दर्शित चिन्मय मांडलेकर लिखित हिरकणी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून याच निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टिम सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर सुर नवा ध्यास नवाच्या मंचावर येणार आहे. यांनी मिळून मंचावर बरीच धम्माल मस्ती देखील केली.

सोनाली कुलकर्णीने चित्रपटामधील अंगाई सादर केली तर प्रसाद ओकने देखील गाणे सादर केले आहे. सगळ्याच स्पर्धकांनी एकसे बडकर एक गाणी सादर करून सगळ्यांची मने जिंकली आहेत. राजेश मापुस्कर यांनी 3 इडियट्स चित्रपटादरम्यानचा किस्सा सांगितला तर अमोलच्या गाण्याला त्यांच्याकडून दाद मिळाली. तसेच स्वराली जोशीने सादर केलेल्या व्हेंटिलेटर या चित्रपटातील “बाबा” हे गाणे ऐकून राजेश मापुस्कर भावुक झाले.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

कार्यक्रमामध्ये मंजिरी ओक यांनी त्यांच्या आणि प्रसाद ओक यांच्या लव्ह स्टोरीबद्दल देखील सांगितले ते कसे भेटले, त्यांचे लग्न कसे जुळले. या आठवड्यामध्ये स्वप्नील बांदोडकर गेस्ट जज म्हणून सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर येणार असून त्यांचा मोलाचा सल्ला स्पर्धकांना मिळणार आहे.