पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील जनतेला रविवारी रात्र नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिवा लावून एकतेचं प्रदर्शन घडवण्यासाठी आवाहन केलं होतं. मोदींच्या आवाहनानंतर संपूर्ण देशवासीयांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.मात्र काही नागरिकांनी  फटाके वाजून या दिवसाला गालबोट लावलं. अनेकांनी दिवा, मेणबत्ता, बॅटरी लावण्याऐवजी रस्त्यावर उतरुन फटाक्यांची आतिषबाजी केली. त्यामुळे अभिनेत्री सोनम कपूरने संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री सोनम कपूर कायमच समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असते. त्यावेळीदेखील तिने निर्भीडपणे तिचं मत मांडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता देशातील जनतेला दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र काही नागरिकांनी रस्त्यावर उतरुन चक्क फटाक्यांची आतिषबाजी केली. ज्यामुळे वातावरणात वायूप्रदुषण आणि ध्वनीप्रदुषण निर्माण झालं. याच कारणास्तव सोनमने राग व्यक्त केला आहे.

“आपल्या देशात असेही काही नागरिक आहेत ज्यांनी दिवाळी समजून फटाक्यांची आतिषबाजी केली. या फटाक्यांमुळे, त्याच्या आवाजामुळे मुक्या प्राण्यांना त्रास होत आहे. जेथे शांततेचं वातावरण होते तिथे या मुर्ख नागरिकांनी फटाके वाजविले”, असं ट्विट सोनमने केलं आहे.

दरम्यान, सोनमने ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.मात्र सोनम प्राणीप्रेमी असून कोणत्याही मुक्या जनावरावर अन्य होत असेल तर ती लगेच त्यावर व्यक्त होत असते, हे वारंवार तिने दाखवून दिलं आहे.