23 January 2021

News Flash

सोनमचा वाढदिवस आणि तिच फोटोतून गायब; शत्रुघ्न सिन्हांच्या चुकीवरून भन्नाट मीम्स व्हायरल

सोनमच्या लग्नाच्या रिसेप्शनमधलाच एक ग्रुप फोटो शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता. मात्र त्यात सोनमच कुठे दिसत नव्हती.

अभिनेत्री सोनम कपूरचा नुकताच वाढदिवस पार पडला. या वाढदिवसानिमित्त सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छांमध्ये ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पोस्ट केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. कारण सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी फोटो तर पोस्ट केला, पण त्या फोटोत सोनमच कुठे दिसत नाहीये. शत्रुघ्न सिन्हांच्या या ट्विटवर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

सोनमच्या लग्नाच्या रिसेप्शनमधलाच एक ग्रुप फोटो शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यानंतर लगेच ती पोस्ट व्हायरल झाली. त्यावरून मीम्ससुद्धा तयार केले गेले. हे लक्षात येताच त्यांनी तो फोटो डिलिट केला. सोनमचे वडील अनिल कपूर यांच्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाचा संदर्भ देत नेटकऱ्यांनी काही विनोदी मीम्स पोस्ट केले आहेत.

काहींनी तर शत्रुघ्न सिन्हा यांच्या राजकारणातील वावरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उपरोधिक पोस्ट लिहिली. ‘शत्रुघ्न सिन्हा यांचा राजकारणात जितका वावर आहे, तितकाच सोनमचा या फोटोत आहे’, असं म्हणत युजरने खिल्ली उडवली. तर काहींनी सोनमचा फोटो एडिट करून तो ग्रुप फोटो पुन्हा पोस्ट केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 12:43 pm

Web Title: sonam kapoor missing from shatrughan sinha birthday post for her ssv 92
Next Stories
1 सोनू सूद म्हणाला “मला चीनी लोकांची माहिती पाठवा”; जाणून घ्या काय आहे प्रकरण
2 आलियानं वाढदिवस असलेल्या कर्मचाऱ्याच्या हातून केक खाण्यास दिला नकार, कारण…
3 माजी मॅनेजरच्या निधनावर सुशांत सिंह म्हणाला…
Just Now!
X