23 November 2020

News Flash

Video : ‘दीपिका, कतरिनाला ओळखत नाही’ – सोनम कपूर

तिने कलाविश्वातील अनेकांवर निशाणा साधला आहे

कतरिना, सोनम, दिपिका

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. सोनम कायमच तिचं मत आणि मुद्दे स्पष्टपणे मांडत असते. तिच्या याच स्पष्टवक्तेपणामुळे तिने कलाविश्वातील अनेकांवर निशाणा साधला आहे. अभिनेत्री कंगना रणौत, कतरिना कैफ, शोभा डे, अभय देओलसह तिचे अनेक कलाकारांसोबत मतभेद आहेत. त्यातच आता सोनमचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनमने अभिनेत्री दीपिका आणि कतरिना कैफला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे.

सोनमने काही वर्षांपूर्वी ‘झूम’ या वाहिनीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला असून तो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे आज (९ जून) सोनमचा वाढदिवस असल्यामुळे हा व्हिडीओ चर्चिला जात आहे. या व्हिडीओमध्ये तिने कतरिना, दीपिकाला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे.

या मुलाखतीमध्ये सोनमला तिच्या करिअर आणि पर्सनल लाईफविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये तिला तिची मैत्रीण कोण?, कोणासोबत मैत्री करायला आवडेल?, यासारखे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देतांना तिने ‘राणी माझी जवळची मैत्रीण असून असिनसोबतदेखील मैत्री करु शकते’, असं सांगितलं होतं. मात्र दिपिका आणि कतरिना कोण आहेत ? असा प्रतिप्रश्नही तिने विचारला.

“राणी माझी चांगली मैत्रीण आहे. एकदा तिला बरं नसताना मी रात्री तिच्यासाठी औषधं घेऊन तिच्या घरी गेले होते. तर अभिनेत्री असिन माझी प्रतिस्पर्धी आहे, मात्र तिच्याशीही मी मैत्री करु शकते. मात्र दीपिका आणि कतरिनाला मी ओळखत नाही. कतरिना माझ्या भावाची अर्जुनची चांगली मैत्रीण आहे आणि आम्ही भावंड एकमेकांच्या मैत्रीमध्ये फूट पाडत नाही”, असं सोनम यावेळी म्हणाली.

दरम्यान, आज अभिनेत्री सोनम कपूरचा वाढदिवस आहे. सोनमने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘सावरियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, आणि पाहता पाहता कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. सोनमच्या एकंदर वागण्याबोलण्याचा अंदाज आणि फॅशन जगतातील तिचा वावर पाहता बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ म्हणूनही ती नावारुपास आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2019 3:34 pm

Web Title: sonam kapoor said i dont know katrina kaif and deepika padukone ssj 93
Next Stories
1 Video : चाहत्याला पायाशी बसून ठेवल्यामुळे रणबीर कपूर ट्रोल
2 Bigg Boss Marathi 2 : एकेकाळी रोजच्या जेवणासाठीही शिवानी सुर्वेला करावा लागला होता संघर्ष
3 ‘मला कधीच चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या नाही’, कोंकणाने व्यक्त केली खंत
Just Now!
X