बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी सोनम तिच्या इन्स्टा कॉमेंटमुळे चर्चेत आहे. किंबहूना या कॉमेंटमुळे नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.
सोनमने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या नेहमीच्याच स्टाईलीश लूकमध्ये दिसत आहे. हे देवा मी काय करु शी कॉमेंट तिने या फोटोवर केली आहे. परंतु या कॉमेंटमुळेच नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.
Kindly help those needy persons in lockdown situations
— Gulzar Ali Dahri (@Gulzar38200543) May 13, 2020
acting karna bund kardo
— PRASAD SHETTY (@PRASADSEWAG) May 13, 2020
Tiles clean karo pochaaa maroooo
— AJIT PATIL (@AJITPAT14733092) May 13, 2020
सोनम जी, आपके पास तो काफ़ी पैसे है, बहुत कुछ कर सकते है, तो थोड़ा दान ही कर दीजिए।।
— Virat (@ViraatKohli4) May 13, 2020
एका युजरने सोनमला अभिनय सोडण्याची विनंती केली. दुसऱ्याने तिला घरात साफ सफाई करण्याचा सल्ला दिला. एकाने तर पैसे दान करा असा संदेश दिला. अशा अनेक गंमतीशीर प्रतिक्रिया सोनमच्या फोटोवर दिल्या गेल्या आहेत. सोनम कपूरला यापूर्वी अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. परंतु प्रत्येक वेळी ती ट्रोलर्सला चांगलेच प्रत्युत्तर देते. या पार्श्वभूमीवर सोनम आता काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2020 6:44 pm