News Flash

रणबीरविषयी आलियाची आई म्हणते..

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चा दर दिवसागणिक पाहायला मिळत आहेत.

रणबीर कपूर, सोनी राजदान, आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चा दर दिवसागणिक पाहायला मिळत आहेत. सध्या बी- टाऊनमधील ही बहुचर्चित जोडी आहे. आलिया- रणबीरने आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचं बल्गेरियामधील शूटिंग पूर्ण केलं असून कामासोबतच त्यांच्या नात्यालाही ते तितकंच प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आलिया- रणबीरच्या प्रेमप्रकरणाविषयी ज्यावेळी सर्वांना माहिती मिळाली तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबियांनाही विविध कार्यक्रमात याविषयीचे प्रश्न विचारले जाऊ लागले. आलियाची आई सोनी राजदान यांनाही एका मुलाखतीत रणबीर- आलियाच्या नात्याविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘माझ्या मुलीसोबत माझं खूप चांगलं नातं आहे. सध्या होणाऱ्या चर्चांवर विश्वास ठेवण्यापेक्षा मी थेट तिच्याशीच याबद्दल बोलणं पसंत करेन. तिच्या आयुष्यात काय घडतंय याबद्दल ती सर्वकाही मला सांगत असतेच.’

वाचा : वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रियांकाला अस्थमाचा त्रास 

आलियाचं रणबीरशी असलेल्या नात्याबद्दल फारसं काही न सांगता त्या पुढे म्हणाल्या की, ‘मी अशा गोष्टींवर सहसा कोणा तिसऱ्या व्यक्तीशी चर्चा करत नाही. अर्थात आम्ही रणबीरला खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. तो खूपच चांगला मुलगा आहे.’

याआधी एका मुलाखतीत रणबीरचे वडील ऋषी कपूर यांनादेखील आलियाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. ‘आपलं आयुष्य कसं जगावं हे ठरवण्याचा सर्वस्वी हक्क रणबीरलाच आहे. त्याने कोणाशी लग्न करावं हा निर्णयही त्याचाच आहे. नीतूला ती आवडते आणि मलाही ती आवडते. मीच काय पण माझ्या काकांनीही त्यांच्या पसंतीच्या जोडीदाराशी लग्न केलं. मग रणबीरच्या निर्णयावर मी का हरकत घ्यावी,’ असं उत्तर त्यांनी दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 2:36 pm

Web Title: soni razdan has this to say about daughter alia bhatt boyfriend ranbir kapoor
Next Stories
1 Video : …जेव्हा जस्लीन सावरते अनुप जलोटा यांची बाजू
2 Koffee With Karan Season 6 Promo : सेलिब्रिटींना करावा लागणार करणच्या चुकीच्या प्रश्नांचा सामना 
3 वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रियांकाला अस्थमाचा त्रास
Just Now!
X