करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. आतापर्यंत त्याने शेकडो मजुरांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवले आहे. त्याच्या या कामाची प्रचंड स्तुती होत आहे. आता त्याने आणखी ४०० मजुरांना आर्थिक मदत करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. यासाठी त्याने प्रशासनाकडे या मजुरांची संपूर्ण माहिती मागितली आहे.

अवश्य पाहा – आलिया भट्टच्या बहिणीला बलात्कार व जीवे मारण्याची धमकी; करणार कायदेशीर कारवाई

लॉकडाउनच्या काळात बेरोजगार झालेले अनेक मजुर आपल्या गावी जात होते. या प्रवासात अनेकांचे अपघात झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. परिणामी त्यांच्या कुटुंबियांसोर जगण्यामरण्याचा प्रश्न उद्भवला आहे. बिकट परिस्थितीत असलेल्या अशा तब्बल ४०० मजुरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा विडा सोनू सूदने उचलला आहे. यासाठी त्याने मजुरांची अधिकृत माहिती प्रशासनाकडे मागितली आहे.

अवश्य वाचा – टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.