News Flash

आईच्या आठवणीत सोनू सूदने शेअर केली पोस्ट, व्हिडीओ पाहून चाहते भावून

आईसाठी लिहायचा चिठ्ठी

९ मे या दिवशी मातृदिनानिमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याच निमित्ताने सध्या देशवासियांसाठी धडपड करणाऱ्या सोनू सूदने देखील एक खास पोस्ट शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आईच्या आठवणीत पोस्ट शेअर करत असताना सोनू भावूक झाला. सोनूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओत त्याने आईच्या आठवणींना उजाळा दिलाय. फक्त ‘मा’ असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलंय. सोनू सूदची आई सरोज सूद यांच काही वर्षांपूर्वी निधन झालंय. या व्हिडीओत सोनूने आईचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. तारे जमीं पर’ या सिनेमातील ‘मा’ या गाण्यावर हा व्हिडीओ प्ले होताना दिसतोय.

या व्हिड़ीओमध्ये सोनूने आईसाठी लिहलेल्या काही नोटस् दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला लिहलंय. ” तू कायम मला स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी मजबूत बनवलं. ” सोनूच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अेक जण सोनूची ही पोस्ट पाहून भावूक झाले आहेत.

सोनू सूदची आई प्रोफेसर होत्या. नुकतचं पंजाबमधील मोगा इथं एका रस्त्याला त्यांचं नावं देण्यात आलंय. सोनू सूदने एक व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला होता. यावेळी सोनू म्हणाला होता की ती जागा त्याच्यासाठी खूप खास आहे. कराण तिथल्या एका रस्त्याला त्याच्या आईचं नाव देण्यात आलंय. याच रस्त्यावरून सोनूच्या आई कॉलेजला जात.गेल्या वर्षभरापासून सोनू सूद गरजवंतांच्या मदतीला धावून जातोय. आरोग्य सुविधेसोबत बेरोजगारांसाठी सोनूने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे अनेकांसाठी सोनू देवदूत ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 4:16 pm

Web Title: sonu sood share post on social media on mothers day in mothers memory fans get emotional kpw 89
Next Stories
1 ‘रक्तदान करताना मास्क लावण्याची परवानगी नाही’, ट्रोल करणाऱ्यांना सोनू निगमचे उत्तर
2 दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर करोना पॉझिटिव्ह
3 अभिनेते मोहन जोशी करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X