दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज कोनिडेला याला करोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता राम चरणचे देखील करोना रिपोर्टस् पॉझिटिव्ह आहेत. वरुण तेजला करोनाची लागण झाल्यानंतर त्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली.
करोनाची लक्षणं जाणवत असल्यामुळे वरुण तेजने करोना चाचणी केली. त्यात त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या वरुण तेज हैदराबादमधील त्याच्या घरीच क्वारंटाइन झाला आहे.
View this post on Instagram
“करोनाची काही लक्षण जाणवत होती, त्यामुळे मी करोना चाचणी केली. त्यात माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या मी घरीच क्वारंटाइन झालो आहे आणि योग्य ती खबरदारी बाळगत आहे. लवकरच परत येईन. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत असल्यामुळे धन्यवाद”,अशी पोस्ट वरुण तेजने शेअर केली आहे.
वाचा : कॉमेडियन राजू श्रीवास्तवला जीवे मारण्याची धमकी; अमित शाहंकडे मागितली मदत
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राम चरण आणि वरुण तेज यांनी ख्रिसमस पार्टी केली होती. त्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या पार्टीमध्ये त्यांची बहीण निहारिका, साई धर्म तेज, अल्लू सिरीश, अल्लू बॉबी, चिरंजीवीच्या दोन्ही मुली श्रीजा आणि सुष्मिता यांची उपस्थिती होती.