27 February 2021

News Flash

‘१०२ नॉट आऊट’च्या स्क्रिनिंगसाठी ‘या’ खास व्यक्तीची हजेरी

'१०२ नॉट आऊट' हा चित्रपट ४ मे रोजी प्रदर्शित होणार असून तत्पूर्वी या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगवेळी बॉलिवू़ड कलाकारांच्या मांदियाळीमध्ये

१०२ नॉट आऊट

१९७०-७५ चा काळ गाजवणारे अभिनेता अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे २७ वर्षानंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अमिताभ आणि ऋषी हे उमेश शुक्ला दिग्दर्शित ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटामधून पुन्हा आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहेत. ‘१०२ नॉट आऊट’ हा चित्रपट ४ मे रोजी प्रदर्शित होणार असून तत्पूर्वी या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगवेळी बॉलिवू़ड कलाकारांच्या मांदियाळीमध्ये एक खास चेहरा पाहायला मिळाला.

‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी बच्चन कुटुंबियांसह ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या आई इंदिरा बहादुरी या आपल्या जावयाच्या म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आल्या होत्या. इंदिरा बहादुरी या वयातही स्क्रिनिंगसाठी आल्यामुळे उपस्थित सर्वांनाच एक सुखद धक्का मिळाला.

यावेळी अभिनेता अभिषेक बच्चन आणि बच्चन कुटुंबियांची सून ऐश्वर्या राय आपल्या आजेसासूची काळजी घेतांना दिसली. बच्चन कुटुंबियांप्रमाणए कपूर कुटुंबातील मंडळींचीही या स्क्रिनिंगला उपस्थिती पाहायला मिळाली. अभिनेता रणबीर कपूर हा देखील आपल्या वडिलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होता.
‘१०२ नॉट आऊट’ हा चित्रपट वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर हळूवार फुंकर घालणारा असून बिग बी हे ऋषी कपूर यांच्या वडीलांची भूमिका साकारत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्ष चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला तर ऋषी कपूर यांनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आता हे दोन्ही कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 10:46 am

Web Title: special screening of amitabh bachchan rishi kapoor 102 not out
Next Stories
1 ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ पाहताना कामगाराचा मृत्यू
2 ‘नाईटीत कशी दिसतेस ते पाहायचे आहे’ माही गिलने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
3 Video : ..जेव्हा श्रीदेवी यांनी उडवली जान्हवीच्या हिंदीची खिल्ली
Just Now!
X