करण जोहरचा आगामी चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ हा चित्रपट वर्षाअखेर प्रदर्शित होणार होता. मात्र आता करणचे हे नवे स्टुडंट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून तारा सुतारिया आणि अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होते, मात्र दोघींच्या बॉलिवूडमधल्या प्रवेशाची तारीख आता पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे करणचा बहुप्रतिक्षीत ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ २३ नोव्हेंबर ऐवजी आता मे २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
करणनं विचारपूर्वक ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. याच महिन्यात रजनीकांत अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘२.०’ प्रदर्शित होत आहे. बिग बजेट चित्रपट आणि तितकीच मोठी स्टारकास्ट असलेल्या ‘२.०’ मुळे ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ च्या कमाईवर नक्कीच परिणाम होईल अशी भीती करणला वाटते आहे त्यामुळे त्यानं आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. हा चित्रपट आता १० मे २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
https://twitter.com/karanjohar/status/1023905843258028032
२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’चा हा सिक्वल असणार आहे. या चित्रपटातून वरूण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे ‘SOTY 2’ला तितकाच प्रतिसाद लाभतो का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.