छोट्या पडद्यावर गाजत असलेला शो म्हणजे ‘इंडियन आयडॉल’. सध्या या शोचं १२ वं पर्व असून हा शो सातत्याने चर्चेत येत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी या मंचावर हजेरी लावली असून स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. अलिकडेच या शोमध्ये सुभाष घईंनी हजेरी लावली होती.विशेष म्हणजे यावेळी त्यांनी अरुणीताला एक खास मोलाचा सल्ला दिला.

अलिकडे झालेल्या भागात अरुणीताने ‘मेरा पिया घर आया’ हे गाणं सादर केलं. हे गाणं अभिनेत्री माधुरी दिक्षितवर चित्रीत करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हे गाणं सुभाष घई यांना विशेष भावलं. त्यामुळे त्यांनी मंचावर येत अरुणीताला खास मोलाचे सल्ले दिले. अरुणीताने गायलेलं गाणं ऐकून सुभाष घई यांनी तिला काही खास टिप्स दिल्या. या गाण्यातील माधुरी दिक्षितचा डान्स तुफान लोकप्रिय झाला होता. त्यामुळेच या गाण्यासाठी तिने कशा प्रकारे एक्सप्रेशन्स म्हणजे हावभाव दिले होते हे सुभाष घई यांनी अरुणीताला शिकवलं.

सिद्धार्थ-मितालीच्या घरी लग्नाची लगबग; पाहा ग्रहमखाचे खास फोटो

“ ज्यांनी माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रींसोबत काम केलं आहे, अशा सुभाष घईंकडून मला खास टिप्स मिळाल्या. मी खरंच हा दिवस कधी वसरणार नाही आणि कायम त्यांची ऋणी राहिन. इंडियन आयडॉलने मला एवढी मोठी संधी दिली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते”, असं अरुणीता म्हणाली.