25 September 2020

News Flash

सुबोध भावेला साकारायचीय शरद पवारांची भूमिका

''मनात काय चाललंय हे तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही. हे फार अवघड आहे.'

शरद पवार, सुबोध भावे

आजवर अनेक दिग्गजांच्या भूमिका मी साकारल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका साकारायला नक्कीच आवडेल, असं मत अभिनेता सुबोध भावेनं व्यक्त केलं. सुबोधनं आतापर्यंत लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांचे बायोपिक केले.

‘मनात काय चाललंय हे तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही. हे फार अवघड आहे. शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढं बघितलंय तेवढं आज राजकारणात कोणीच पाहिलेलं नाही. मी चेष्टा म्हणून म्हणत नाही, पण सतत सातत्यानं व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल,’ असं सुबोध म्हणाला.

वाचा : सलमानची ‘मन्नत’! विकत घ्यायचा होता शाहरुखचा बंगला, पण..

याआधी सुबोधनं जेव्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीची मुलाखत घेतली होती तेव्हा तो राहुलचा बायोपिक करणार याची चर्चा झाली होती. सुबोध स्वत: शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा पदाधिकारी आहे.

सध्या सुबोध ‘तुला पाहते रे’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचसोबत ‘अश्रुंची झाली फुले’ या त्याच्या नाटकाचे प्रयोगसुद्धा सुरू आहेत. इतकंच नव्हे तर आगामी ‘AB आणि CD’ या चित्रपटात तो बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबक काम करणार आहे. सोशल मीडियावर बिग बींसोबतचा फोटो शेअर करत सुबोधने स्वप्न साकार झाल्याची भावना व्यक्त केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 2:07 pm

Web Title: subodh bhave wants to do biopic of sharad pawar
Next Stories
1 हो, हारणाऱ्यांचाच मी प्रचार केला- स्वरा भास्कर
2 सलमानची ‘मन्नत’! विकत घ्यायचा होता शाहरुखचा बंगला, पण..
3 रणवीर साकारणार गुजराती भूमिका; यश राजच्या ‘जयेशभाई जोरदार’ची घोषणा
Just Now!
X