News Flash

गावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली…

"गावसकरांनी नॅशनल टेलिव्हिजनवर केलेलं ते वक्तव्य म्हणजे..."

माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पंजाब वि. बंगळुरू सामन्यात समालोचन करताना विराटवर टीका केली आणि त्यातच अनुष्काचाही उल्लेख केला. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “लॉकडाउन था, तो सिर्फ अनुष्का के बॉलिंग की प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर काहींनी टीका केली. इतकंच नव्हे तर खुद्द अनुष्कानेदेखील गावसकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या वादात आता अभिनेत्री कंगना राणौत उडी घेतली आहे.

“जेव्हा मला धमक्या देण्यात आल्या आणि माझ्याबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारण्यात आले त्यावेळी अनुष्का शांत राहिली. पण आता काहीसा तसाच आक्षेपार्ह प्रकार तिच्याबाबत घडला आहे. सुनील गावसकर यांनी क्रिकेटच्या सामन्यात तिचा असा उल्लेख करण्याचा मी निषेध करते. पण त्याचसोबत, सर्वच स्त्रियांचा आदर व्हायला हवा. काही स्त्रियांना वेगळा न्याय आणि काहींना वेगळा न्याय ही बाब बरोबर नाही”, असं ट्विट तिने केलं.

“गावसकर यांनी समालोचनाच्या वेळी केलेल्या टिप्पणीमध्ये केवळ वाईट मनोवृत्तीच्या लोकांनाच sexual context असल्यासारखं वाटू शकतं. अनुष्का तिच्या पुढील प्रोजेक्टमध्ये क्रिकेटपटूची भूमिका साकारते आहे आणि ती तिचा पती विराटसोबत क्रिकेटचा सराव करतानाचे अनेक व्हिडीओ आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की की त्यांनी अनुष्काचा उल्लेख करायला नको होता”, असेही कंगनाने नमूद केलं.

दरम्यान, या मुद्द्यावर चेन्नई वि. दिल्ली सामन्यात समालोचन करताना गावसकर यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. “मी विराटच्या अपयशासाठी अनुष्काला जबाबदार ठरवलं नाही. मी कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह टिप्पणी केलेली नाही. लॉकडाउनमध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये अनुष्का विराटला गोलंदाजी करत होती. त्याबद्दल बोलताना अनुष्काने विराटला गोलंदाजी केली असं मी म्हटलं होतं. त्यात मी अनुष्काला दोषी ठरवलं नव्हतं. लॉकडाऊन काळात विराटने एवढीच गोलंदाजी खेळली होती”, असंही गावसकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 11:00 pm

Web Title: sunil gavaskar anushka sharma controversial statement row kangana ranaut jumps into debate tweets down opinion vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 शेतकरी आंदोलनावर प्रकाश राज यांनी केले ट्विट, म्हणाले…
2 अभिनेत्रीला दुसऱ्यांदा अर्धांगवायूचा झटका, चाहत्यांकडे केली आर्थिक मदतीची मागणी
3 करण जोहरच्या घरात झाली होती ड्रग्ज पार्टी? एनसीबीकडून चौकशीची शक्यता
Just Now!
X