News Flash

सुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर

या फोटोमध्ये सुनीलने एखाद्या अॅक्शन हिरोसारखी पोज दिली आहे.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान आगामी ‘भारत’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण माल्टा येथे होणार असल्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम माल्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथम छोट्या पडद्यावरील विनोदवीर सुनील ग्रोवर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे सध्या सुनीलची चर्चा असून नुकताच त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला फोटो सुनीलने सोशल मीडियावर शेअर केला असून त्याचा हा फोटो चक्क सलमान खानने काढला आहे. या फोटोमध्ये सुनीलने एखाद्या अॅक्शन हिरोसारखी पोज दिली आहे. त्यामुळे त्याचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीत उतरत आहे.

‘लवकरच यापेक्षा चांगल्या पोजमधले फोटो पोस्ट करेन. त्यामुळे आता केवळ फोटोग्राफरकडेच पाहू नका’. असं कॅप्शन सुनीलने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये सुनीलबरोबर सलमानही दिसत आहे. विशेष म्हणजे सलमानच्या हातात कॅमेरा असून सलमानने हा फोटो काढला आहे.

दरम्यान, अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’मध्ये सलमानबरोबर कतरिना कैफ, दिशा पटानी आणि सुनील ग्रोवर स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2018 6:59 pm

Web Title: sunil grover salman khan bharat malta photo shoot bollywood viral pics
Next Stories
1 Kerala floods : केरळमध्ये होणाऱ्या रेल्वे भरती बोर्डाच्या परिक्षा पुढे ढकलल्या
2 भाईजानच्या ‘भारत’मध्ये झळकणार आणखी एक अभिनेत्री
3 Video : श्रीदेवी यांच्या अखेरच्या वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X