कॉमेडियन सुनील ग्रोव्हर ‘द कपिल शर्मा’ शोमुळे घराघरात पोहोचला. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सुनील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या सुनीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सुनीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुनील रस्त्यावर असलेल्या एका ठेल्यावर मोसंबीचा रस बनवताना दिसत आहे. ग्लास उडवत वेगवेगळ्या कसरती करताना तो दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करत सुनील म्हणाला, “तुमच्या डार्लिंगला हा रस प्यायला द्या.” सुनीलच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला १८ लाख पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.
View this post on Instagram
या आधी सुनीलने असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यापैकी एकात सुनील दाल मखनी बनवत होता. तर एका व्हिडीओत त्याने छोले कुल्चे बनवताना दिसत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
सुनील ग्रोव्हरची ‘तांडव’ ही वेब सीरिज काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाली होती. या वेब सीरिजमध्ये सुनीलने, अभिनेता सैफ अली खान, मौहमद जीशान अय्यूब, अभिनेत्री गौहर खान, डिंपल कपाडिया यांच्या सोबत मुख्य भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधून सुनील फक्त एक कॉमेडियन नाही तर एक उत्तम अभिनेता असल्याचे दिसून आले आहे. या आधी सुनीलने ‘गब्बर इज बॅक’, ‘भारत’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती.