18 November 2017

News Flash

‘यमला पगला दिवाना-२’ मध्ये सनी देओलचा मुलगा करन गाणार

यमला पगला दिवाना चित्रपटाच्या दुस-या भागात सनी देओलचा मुलगा करन गाणार असल्याचे कळले आहे.

मुंबई | Updated: February 28, 2013 6:08 AM

यमला पगला दिवाना चित्रपटाच्या दुस-या भागात सनी देओलचा मुलगा करन गाणार असल्याचे कळले आहे. एवढंच नव्हे तर त्यासाठी त्याने काही गाणीही लिहिली आहेत. आपला काका बॉबी देओल याच्यासोबत करनने काही ओळी गायल्या असून या चित्रपटाचे खरे आकर्षण असलेले तीन देओल (धमेंद्र, सनी आणि बॉबी) या गाण्यावर पाय थिरकणार आहेत. दरम्यान, देओल कुटुंबियांकडून करनला अभिनयाचंही प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे तो लवकर एखाद्या नवीन चित्रपटात दिसला तर आश्चर्य वाटायला नको.    

First Published on February 28, 2013 6:08 am

Web Title: sunny deols son karan to sing in yamla pagla deewana 2