20 January 2021

News Flash

भारतीय इकडे घरात अडकून; तिकडे सनी लिओनीची कुटुंबासहीत बीचवर धमाल

सनी लिओनी मे महिन्यात लॉकडाउनदरम्यान भारताबाहेर गेली.

करोना व्हायरसपासून स्वत:ला आणि मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी अभिनेत्री सनी लिओनी मे महिन्यात लॉकडाउनदरम्यानच भारताबाहेर गेली. ‘मदर्स डे’निमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने लॉस एंजिलिसला गेल्याची माहिती दिली होती. लॉस एंजिलिसमध्ये सनी पती डॅनिअल व आपल्या तीन मुलांसोबत समुद्रकिनारी धमाल मजामस्ती करत आहे. त्याचे फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सँटा मोनिका बीचवर सनीने तिच्या कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवले आहेत.

सनीने एका मुलाखतीत मुंबई सोडण्यामागचं कारण सांगितलं होतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “मला मुंबई सोडायची नव्हती. त्यामुळे मला इथे येण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागला. पण डॅनिअलच्या आईसाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय घ्यावा लागला. अशा कठीण काळात कुटुंबीयांसोबत राहणं जास्त महत्त्वाचं आहे.”

लॉस एंजिलिस येथील बंगल्यात सनी व तिचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचं सनीने सांगितलं. त्याचसोबत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होताच भारतात परतणार असल्याचं तिने स्पष्ट केलं. “मला मुंबईची फार आठवण येते. जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होतील, तेव्हा मी परत येईन. डॅनिअल आणि मुलांनाही लवकरात लवकर भारतात परतायचं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 5:17 pm

Web Title: sunny leone beach pics with husband kids will make you green with envy ssv 92
Next Stories
1 Video : “..अन् पैजेचा विडा चित्रपट मिळाला”
2 सासू झाली आई, ‘अग्गंबाई सासूबाई’ एका नव्या वळणावर
3 विनोदी लेखन कसं करायचं? संजय मोनेंनी दिला नव्या लेखकांना ‘हा’ खास सल्ला
Just Now!
X