25 February 2021

News Flash

सनी लिओनी पुन्हा ठरली ‘नंबर वन’

काही वर्षांपूर्वी 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमधून सनी लिओनीनं भारतात पाऊल ठेवलं.

सनी लिओनी, sunny leone

बॉलिवूडमधल्या भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकत सनी लिओनी फेसबुकवर सर्वाधिक सर्च केली जाणारी अभिनेत्री ठरली आहे. याआधी २०१४ मध्ये ती गुगलवर सर्वाधिक सर्च केली जाणारी व्यक्ती ठरली होती. काही वर्षांपूर्वी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून सनी लिओनीनं भारतात पाऊल ठेवलं.

स्कोर ट्रेण्ड्स इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर सनी सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी ठरली आहे. या यादीत तिने बऱ्याच बॉलिवूड कलाकारांना मागे टाकत १०० गुणांसह पहिलं स्थान पटकावलं आहे. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा ९० गुणांसह ‘मोस्ट एंगेंजिंग फेसबुक सेलिब्रिटी’च्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर माधुरी दीक्षित ८६ गुणांसह तिसऱ्या, प्रियांका चोप्रा ८४ गुणांसह चौथ्या आणि जॅकलिन फर्नांडिस ८३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

वाचा : नातीसोबत बिग बी लवकरच खेळणार ‘केबीसी’

अमेरिकेच्या स्कोर ट्रेण्ड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी तयार केली आहे. ‘सनी लिओनीचा वेब बायोपिक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे ती चर्चेत राहिली आणि त्यादरम्यान सनीची लोकप्रियता खूप वाढली. त्याचसोबत ती रणविजयसोबत स्प्लिट्सविलाच्या अकराव्या सिझनमध्ये पाहायला मिळाली. म्हणूनच फेसबुकवर ती सर्वाधिक सर्च होऊ लागली. फेसबुकवर तिच्याविषयीच्या पोस्ट सर्वाधिक पाहिल्या गेल्या,’ अशी माहिती स्कोर ट्रेण्ड्स इंडियाचे सहसंस्थापक अश्वनी कौल यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 2:05 pm

Web Title: sunny leone become most engaging celebrity on facebook
Next Stories
1 प्रकाशझोतापासून दूर असणाऱ्या ‘त्या’ खेळाडूचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार
2 नातीसोबत बिग बी लवकरच खेळणार ‘केबीसी’
3 Asian Games 2018: भारताचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलताना अमिताभ म्हणतात…
Just Now!
X