बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचे लाखो चाहते आहेत. पण चित्रपटात बोल्ड सीन्स देण्याबाबत सनीने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतीच सनीने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला बोल्ड सीन्स देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने “बोल्ड सीन देणे हा माझ्या कामाचा एक भाग आहे. आपण सगळ्यांनी बरेच चित्रपट आणि सीरिज पाहिल्या आहेत ज्यामध्ये बोल्ड सीन हे असतातच. मला असे वाटते तो प्रत्येकाच्या कामाचा एक भागच आहे. असा एकही चित्रपट नाही किंवा सीरिज नाही ज्यामध्ये बोल्ड सीन नाहीत. जर तुम्ही बोल्ड सीन्स पाहिले नसतील तर नक्कीच तुम्ही डिस्नेचे चित्रपट पाहात असाल. जेव्हा बोल्ड सीन सेटवर शूट केले जातात तेव्हा सेटवरील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची काळजी घेते. ज्या व्यक्तींची सेटवर गरज नसते त्या व्यक्ती तेथे थांबत नाहीत” अस सनी म्हणाली.

सनीचा अनामिका हा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’मध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone talked about her bold scene during shooting dcp 98 avb
First published on: 20-01-2021 at 18:58 IST