27 February 2021

News Flash

सनी लिओनीचा अरबाझ खानसोबत रोमान्स!

कच्छमध्ये २५ दिवसांचे चित्रीकरण होणार असून उर्वरित चित्रीकरण परदेशात होणार आहे.

ऑगस्टमध्ये कच्छच्या रणमध्ये 'तेरा इंतजार' या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती.

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी तिच्या आगामी चित्रपटात अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता अरबाझ खान याच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सनी आणि अरबाझ ‘तेरा इंतजार’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ‘स्पिल्ट्सव्हीला’ या टेलिव्हिजन रिआलिटी शोच्या नवव्या पर्वाच्या चित्रीकरणात देखील सनी येत्या काळात व्यस्त असणार आहे. यासोबतच ती अरबाझ सोबतच्या चित्रपटाचे देखील चित्रीकरण करणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये कच्छच्या रणमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

अरबाझसोबत काम करण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रिया देत सनीनेही वृत्ताला दुजोरा दिला आहे. दिग्दर्शक राजीव वालियाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. कच्छमध्ये २५ दिवसांचे चित्रीकरण होणार असून उर्वरित चित्रीकरण परदेशात होणार आहे.
अरबाझसोबत या चित्रपटासाठी याआधीच करार करण्यात आला आहे. तर सनीला चित्रपटाच्या कथेची कल्पना देण्यात आली असून तिने त्वरित होकार कळवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2016 12:10 pm

Web Title: sunny leone to romance arbaaz khan in tera intezaar
टॅग : Arbaaz Khan,Sunny Leone
Next Stories
1 सेलिब्रेटी डायरीः सायली संजीव
2 Vidya Balan: मला मराठी येतं, पण मी बोलणार नाही- विद्या बालन
3 सूनेच्या ‘पर्पल लिप्स’वर अमिताभ यांची प्रतिक्रिया
Just Now!
X