कोणत्याही रिऍलिटी शोचा पहिला दिवस आणि अंतिम फेरी हा प्रवास सर्वांसाठी वेगळाच असतो. पहिल्या दिवशी शो विषयी उत्सुकता असते तर अंतिम फेरीत कोण जिंकेल याविषयी कुतूहल असतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात असंच कुतूहल निर्माण झालंय की कोण होणार ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’. १५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनाले ३१ डिसेंबरला रंगणार आहे. इतके महिने स्पर्धकांमध्ये तयार झालेली चुरस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि आता या स्पर्धेत ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चे टायटल कोण जिंकणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे. ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर गेले कित्येक महिने प्रत्येक स्पर्धक हे एका पेक्षा एक सुपर परफॉर्मन्स देत आहेत. आता अंतिम सोहळ्यात ही स्पर्धा आणखी चुरशीची होणार.

स्पर्धकांच्या परफॉर्मन्सला दाद देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सुपर परफॉर्मन्सचे साक्षीदार होण्यासाठी सोनी मराठी वरील हलक्या-फुलक्या मालिकेतील कलाकार आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी या सोहळ्यात सामिल झाले. पाहुण्या कलाकारांनी स्पर्धकांसोबत केलेली धमाल, स्पर्धकांकडून घेतलेली त्यांच्या अनोख्या प्रतिभेची टीप, काही भावनिक क्षण आणि जजेसचे हटके आणि ग्लॅमरस परफॉमर्न्स पाहण्यासाठी आणि अर्थात कोण ठरणार विजेता हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनाले ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठीवर.

ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
MNS Gudi Padwa Melava Updates
MNS Gudi Padwa Melava : लोकसभेसाठी मनसेचा महायुतीला पाठिंबा, राज ठाकरेंची मोठी घोषणा; इतर अपडेट वाचा एका क्लिकवर…
IPL 2024 The List of Mumbai and Maharashtra Players which team has the most
IPL 2024: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई-महाराष्ट्राचा टक्का सर्वाधिक, पाहा कोणत्या संघात आहेत सर्वाधिक खेळाडू