सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या बहुचर्चित ‘२.०’ या सिनेमाचे मेकिंग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच या सिनेमाची चर्चा होत होती. अक्षय कुमार पहिल्यांदाच रजनीकांत यांच्यासोबत काम करत असून यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार यात एका दुष्ट शास्त्रज्ञाची भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून ‘बाहुबली २’ कडे पाहिले जात होते. पण ‘बाहुबली’लाही रजनी यांचा ‘२.०’ सिनेमा तगडी स्पर्धा देईल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
एस. शंकर दिग्दर्शित या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई केली आहे. या सिनेमाने थिएटर राइट्स ८० कोटी रुपयांना विकलेत. इतकच नाही तर सिनेमाचे सॅटेलाइट राइट्स ‘झी टिव्ही’ने ११० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. त्यामुळे सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच १९० कोटी रुपयांची सहज कमाई केली आहे.
एखादा भव्य सिनेमा बनवताना त्यात तंत्रज्ञानापासून ते स्पेशल इफेक्टपर्यंत आणि लोकेशनपासून ते कलाकारांपर्यंत अनेक गोष्टींसाठी परदेशाची निवड केली जात होती. पण सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘रोबोट २.०’ हा सिनेमा यास अपवाद ठरणार आहे. या सिनेमातील तंत्रज्ञांपासून ते यात वापरण्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही भारतीय असणार आहे.
Making of #2Point0 https://t.co/hb3lC5q3B5
— Shankar Shanmugham (@shankarshanmugh) August 25, 2017
‘२.०’ मध्ये रजनीकांत दुहेरी भूमिकेत दिसणार असून अॅमी जॅक्सनचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ४५० कोटींचे बजेट असलेला हा सिनेमा जगभरात सुमारे १५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.