25 April 2019

News Flash

लवकरच छोट्या सूरवीरांची होणार सुरांशी दोस्ती

कलर्स मराठीने सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर हे नवं पर्व आणलं आहे.

संगीत हा मराठी रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. संगीताच्या माध्यमातून अनेक भाव-भावना व्यक्त होतात तर काही वेळा जुन्या आठवणींना उजाळाही मिळतो. गाणं ही अशी एक गोष्ट आहे जी लहान-थोर साऱ्यांमध्ये जिव्हाळ्याचं नातं निर्माण करतं. गाणं कोणीही गाऊ शकतं. त्यामुळे सध्याच्या लहान मुलांना गायनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी कलर्स मराठीने सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर हे नवं पर्व आणलं आहे.

सूर नवा ध्यास नवाच्या माध्यमातून अनेक लहान सूरवीरांना त्यांच्यातील गायनाची कला सादर करता येणार आहे. यापूर्वीच्या पर्वात सेलेब्रिटी गायकांनी पहिलं पर्व गाजवलं होतं. त्यामुळे आता दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातू लहान सूरवीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे या सूरवीरांची निवड करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख आठ शहरांमधून आता तब्बल सहा हजार मुलांचे ऑडिशन घेण्यात आले. ऑडिशन घेतल्यानंतर या सहा हजार मुलांपैकी ६ ते १५ वयोगटातील बालगायकांची मेगा ऑडिशनची फेरी १३ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.

दरम्यान, मागील पर्वाप्रमाणेच याही पर्वात अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे परीक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत. तर सर्वांची लाडकी अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी या नव्या कोऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

First Published on August 10, 2018 5:41 pm

Web Title: sur nava dhyas nava _chote surveer