अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाशी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव जोडण्यावरुन अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘रिया आदित्य ठाकरेंना कधीच भेटली नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत इतकंच तिला ठाऊक आहे’, असं ते म्हणाले. त्याचसोबत अभिनेता डिनो मोरियाला रिया फक्त कार्यक्रमांमध्ये भेटली असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार सतीश मानशिंदे यांनी अधिकृत स्टेटमेंट जाहीर केला आहे. त्यात ते म्हणाले, ‘रिया आदित्य ठाकरेंना ओळखत नाही आणि तिने कधीच त्यांची भेटसुद्धा घेतली नाही. रियाने कधीच फोनवरून किंवा इतर कोणत्या माध्यमांतून त्यांच्याशी संपर्क साधला नाही किंवा बोलली नाही. तर अभिनेता डिनो मोरियाला रिया ओळखत असून इंडस्ट्रीतील एक कलाकार म्हणून काही कार्यक्रमांमध्ये दोघांची भेट झाली होती.’

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध

आणखी वाचा- हा AU कोण?; सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले

सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी ईडी रिया व तिच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहे. याविषयी तिच्या वकिलांनी पुढे म्हटलं, ‘रियाला मुंबई पोलीस व ईडीने समन्स बजावले होते. तिला बोलावण्यात आलेल्या सर्व तारखांना ती चौकशीसाठी उपस्थित होती. मुंबई पोलीस व ईडीने रिया आणि सुशांत यांच्यातील नातं आणि तिच्या आर्थिक गोष्टींबाबत कसून चौकशी केली. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि ईडीने रियाचा फोन, लॅपटॉप आणि तिचा डीएनएसुद्धा घेतला आहे. यासोबतच तिचे बँक स्टेटमेंट्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर आणि इलेक्ट्रॉनिक डेटा मुंबई पोलीस व ईडीने घेतले आहेत. पोलिसांच्या तपासाचा अहवाल सुप्रीम कोर्टाला सुपूर्द करण्यात आला आहे. रियावर अजूनही बरेच आरोप करण्यात येत आहेत. मात्र ती या सर्व आरोपांवर गप्प आहे. सत्य बदलणार नाही.’

आणखी वाचा- रिया चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा; सुशांतची बहीण नशेत चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायची

डिसेंबर २०१९ मध्ये रिया सुशांतच्या घरी राहायला गेली असंही त्यांनी त्यात स्पष्ट केलं. एप्रिल २०१९ मध्ये एका पार्टीला रिया व सुशांतने हजेरी लावली होती. त्यानंतर ते दोघं डेट करू लागले. सुशांतच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी रिया डिसेंबरमध्ये शिफ्ट झाली आणि ८ जून २०२० पर्यंत रिया व सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. ८ जून रोजी रियाने सुशांतचं घर सोडलं.

१४ जून रोजी सुशांतने वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.