News Flash

“सगळ संपलं, आता घरी चला”, रिया चक्रवर्ती जेलमधून बाहेर येताच शेखर सुमनने केले ट्विट

त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज चॅट समोर येताच एनसीबीकडून चौकशी सुरु होती. या प्रकरणी रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. पण काल, ७ ऑक्टोबर रोजी रियाला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान अभिनेते शेखर सुमन यांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘रियाला जामीन मिळाला आहे आणि आता ती जेलमधून बाहेर आली आहे. सीबीआय आणि एम्सच्या अहवालात कोणताही विरोधाभास नाही. मिरांडा आणि दीपेश यांना देखील जामीन मिळाला. आता कोणतीही दुसरी फॉरेन्सिक टीम तयार केली जाणार नाही. संगळं संपलं. आता घरी जाऊया?’ या आशयाचे ट्विट शेखर सुमन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा, स्वरा भास्कर, सोनी राजधन यांनी रियाच्या जामीनानंतर ट्विट करत आनंद व्यक्त केला होता.

सुशातं सिंह राजपूत प्रकरणी तपास यंत्रणाच्या रडारवर असणाऱ्या रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. कोर्टाने शोविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शोविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 12:02 pm

Web Title: sushant singh rajput death rhea chakraborty bail shekhar suman reaction avb 95
Next Stories
1 Video : लग्नाविषयीची ‘ही’ गोष्ट आजही आईला माहित नाही; चिन्मयच्या लव्हस्टोरीतला भन्नाट किस्सा
2 १ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकताच पायलची माघार; ‘या’ अभिनेत्रीची माफी मागण्यास तयार
3 ‘बिग बॉस’फेम हिमांशी खुरानाची करोनावर मात
Just Now!
X