28 February 2021

News Flash

सुशांतचे वडील रुग्णालयात दाखल; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सुशांतचे वडील लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी चाहते करतायत प्रार्थना

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांना रुग्णालयातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुग्णालयातील बेडवर के. के. सिंह आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या दोन्ही मुली या फोटोत पाहायला मिळत आहेत. हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांना हरयाणामधील फरिदाबाद इथल्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

ट्विटरवर एका युजरने हा फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. सुशांतच्या अनेक फॅनपेजेसवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा ताण त्यांना आणखी सहन होणार नाही, असं संबंधित व्यक्तीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

१४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला. सुरुवातीला आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. दुसरीकडे ईडी आणि एनसीबी या दोन्ही यंत्रणासुद्धा सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील आर्थिक आणि ड्रग्जच्या अँगलच्या तपास करत आहेत.

सुशांतचे वडील लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. तर अनेकांनी सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 12:53 pm

Web Title: sushant singh rajput father kk singh photo from hospital goes viral ssv 92
Next Stories
1 तैमूरच्या वाढदिवसानिमित्त करीनाची खास पोस्ट, “तुझ्या अम्माशिवाय कोणीच..”
2 नेहाला माझं सुख बघवत नाही- आदित्य नारायण
3 गौहर खानची हटके लग्नपत्रिका; व्हिडीओतून दाखवली ‘लॉकडाउन लव्हस्टोरी’
Just Now!
X