News Flash

“रियासोबत युरोपला जाऊन आल्यापासून सुशांत बदलला”; माजी सहाय्यकाने केले धक्कादायक खुलासे

सुशांतच्या अकाऊंटमधील पैसे व रियाने केलेली पूजा यासंदर्भातील केले खुलासे

संग्रहित

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी त्याचा माजी असिस्टंट अंकित आचार्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत. रिया चक्रवर्तीसोबत युरोप ट्रिपवरून आल्यानंतर सुशांत पूर्णपणे बदलल्याचं त्याने सांगितलं. त्याचप्रमाणे सुशांतच्या अकाऊंटमध्ये २०१९ मध्ये जवळपास ३० कोटी रुपये असल्याचीही माहिती त्याने दिली. अंकित आचार्यने जुलै २०१७ ते जुलै २०१९ या कालावधीत सुशांतसोबत काम केलं होतं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं, “मी काही दिवस सुट्टीवर होतो. सुट्टीवरून आल्यानंतर मला समजलं की सुशांत युरोप ट्रिपला गेला. ट्रिपवरून परत आल्यानंतर त्याने मला भेटायला बोलावलं आणि दोन महिन्यांचा पगार दिला. या पगारासोबतच त्याने ५० हजार रुपये अधिक दिले होते. युरोप ट्रिपवरून आल्यानंतर सुशांत पूर्णपणे बदलला होता. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे झाली होती. तो नेहमीसारखा हसता खेळता सुशांत नव्हता.”

आणखी वाचा : “फक्त घराणेशाहीमुळे माझं २१ वर्षांचं करिअर घडलं नसतं”; करीनाचं ट्रोलर्सना उत्तर

रियाने केलेल्या पूजेसंदर्भातही अंकित आचार्यने खुलासा केला. “पूजेची विधी ही आपण नेहमी पूजा करतो तशी नव्हती. लिंबू आणि इतर वस्तूंचा वापर केला गेला होता आणि कोणत्याच देवाची किंवा देवीची मूर्तीसुद्धा नव्हती,” असं त्याने सांगितलं.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचा तपास मुंबई व बिहार पोलीस करत आहेत. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात अनेक गंभीर आरोप केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 5:37 pm

Web Title: sushant singh rajput former assistant ankit acharya alleges actor changed after europe trip with rhea chakraborty ssv 92
Next Stories
1 ‘अर्णब- द न्यूज प्रॉस्टिट्यूट’; संतापलेल्या राम गोपाल वर्मांनी थेट केली चित्रपटाची घोषणा
2 नैराशावर अशी करा मात? अभिनेत्रीने एक मिनिटाच्या फिल्ममध्ये सांगितले उपाय
3 लाइव्ह सेशनमध्ये शहनाजने उगारला सिद्धार्थवर हात, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X