अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. त्याच्या मृत्युनंतर सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी सलमान खान आणि करण जोहर यांना जबाबदार ठरवले जात आहे. त्यातच सध्या ट्विटरवर #BoycottKhans हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिंगमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून नवीन वाद सुरू झाला आहे. अनेकांनी सुशांतच्या आत्महत्येमागे सलमान खानला जबाबदार ठरवलं असून त्याला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच काहींनी सलमानला पाठिंबाही दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सलमान खानचे चाहते व सुशांतचे चाहते यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आहे. त्यातच आता #BoycottKhans हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे.


दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहर आणि सलमान खान या दोघांविरोधात एक ऑनलाईन पिटिशन देखील सुरु करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सलमान खान आणि करण जोहरला धडा शिकवण्यासाठी लाखो लोकांनी त्यावर नोंदणी केली आहे.