News Flash

रियामुळे सुशांत होता त्रस्त; अंकिताने पोलिसांना दाखवले ‘ते’ मेसेज

जाणून घ्या, सुशांत व अंकितामध्ये नेमकं कोणतं संभाषण झालं होतं

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांनी के.के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे संपूर्ण तपासाला आता वेगळं वळण लागलं आहे. ‘त्यातच रिया सुशांतला त्रास देत होती’, अशी माहिती सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेदेखील बिहार पोलिसांनी दिल्याचं ‘सीएनएन न्यूज १८’ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा साऱ्यांच्या नजरा या प्रकरणाकडे वळल्या आहेत.

२०१९ मध्ये अंकिताने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी सुशांतने तिच्याशी संपर्क साधला होता. यावेळी बोलत असताना रियामुळे त्याला त्रास होत असल्याचं त्याने अंकिताला सांगितलं होतं. याचा पुरावा म्हणून अंकिताने सुशांतचे मेसेज देखील पोलिसांना दाखवले होते.

दरम्यान,रियासोबतच्या नात्यात सुशांत खुश नाही असंही त्याने एकदा अंकिताला सांगितलं होतं. रियाला डेट करण्यापूर्वी सुशांत अंकिता लोखंडेला डेट करत होता. जवळपास ६ वर्ष ते एकमेकांसोबत होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुशांतच्या निधनाची बातमी समजताच अंकिता प्रचंड दु:खी झाली असून अनेक वेळा ती सुशांतसाठी पोस्ट करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 2:14 pm

Web Title: sushant singh rajput told ankita lokhande he was unhappy rhea chakraborty harassed him ssj 93
Next Stories
1 ‘सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा’; सुशांतच्या बहिणीचं आवाहन
2 प्राजक्ता माळी देणार होती ‘जुळून येती रेशीमगाठी’ला नकार, कारण…
3 “देशद्रोही म्हणाल तर लक्षात ठेवा मी बॉक्सर आहे, मी…”; ट्रोलर्सवर इरफानचा मुलगा संतापला
Just Now!
X