बॉलिवूड स्टार सुशांत सिंग राजपूतकडे सध्या सिनेमांची काही कमतरता नाही. एम. एस. धोनीची व्यक्तिरेखा असो किंवा व्योमकेश बक्शींची, प्रत्येक व्यक्तिरेखेला योग्य न्याय द्यायचा सुशांत नेहमीच प्रयत्न करत असतो. लवकरच सुशांत ‘चंदा मामा दूर के’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या कथेवरून अनेक चर्चा होत आहेत, या सिनेमात तो एका अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाबद्दल चर्चा सुरू असताना त्याच्या अजून एक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा हा लूक पाहून कोणालाही ‘पान सिंह तोमर’मधील इरफान खानची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.
Sushant Singh Rajput embarks on a new journey… Check out the first look from his new film #Sonchiriya… Abhishek Chaubey directs. pic.twitter.com/t9JOQ6TfZJ
— taran adarsh (@taran_adarsh) January 30, 2018
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर तो ‘चंदा मामा दूर के’मध्ये अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे तर ही डाकूची व्यक्तिरेखा कोणत्या सिनेमासाठी आहे? सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्शने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सुशांतचा हा फोटो ट्विट केला आहे. हा फोटो शेअर करताना तरण यांनी लिहिले की, सुशांत एका वेगळ्या प्रवासासाठी सज्ज झाला आहे. अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘सोनचिरैया’ या सिनेमाचा हा फर्स्ट लूक आहे. सुशांतनेही त्याचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याने या फोटोला वेगवेगळ्या लोकांना टॅग केले आहे.
फोटोत सुशांतने कपाळावर टीळा लावला आहे आणि खाकी गणवेश घातला आहे. त्याच्या एका बाजूला बंदूक तर समोरच्या टेबलावर कॉफीचा कप आहे. सुशांतच्या चाहत्यांसाठी हा फोटो कोणत्याही ट्रीटपेक्षा कमी नसेल. अजून सुशांतच्या ‘चंदा मामा दूर के’ सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आलेला नाही. त्याआधीच त्याच्या ‘सोनचिरैया’ सिनेमाचा लूक प्रदर्शित झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांना या दोन्ही सिनेमांविषयी २०१८ हे वर्ष सुशांतसाठी फार खास असणार आहे यात काही शंका नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 1:13 pm