01 October 2020

News Flash

आत्महत्येच्या एक दिवस आधी सुशांतने केली ‘ही’ गोष्ट

सुशांतच्या कॉल डिटेल्समधून माहिती आली समोर

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १३ जून रोजी सुशांत निर्मात्यांशी त्याच्या चित्रपटांविषयी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत निर्माते रमेश तौरानी आणि दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्याशी चित्रपटाविषयी व पटकथेविषयी चर्चा करत होता.

१३ जून रोजी संध्याकाळी सुशांतने टॅलेंट मॅनेजर उदय सिंह गौरीशी बराच वेळ गप्पा मारल्या. सुशांतची मानसिक स्थिती त्यावेळी अगदी सामान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर सुशांत १५ ते २० मिनिटं निर्माते तौरानी दिग्दर्शक अडवाणी यांच्याशी व्हॉट्स अॅपवर बोलत होता. या चर्चेदरम्यान मी एका चित्रपटाची स्क्रीप्ट सुशांतला सांगितली आणि ते ऐकतानासुद्धा सुशांतची मनस्थिती योग्य होती, अशी माहिती अडवाणींनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इतकंच नव्हे तर सुशांतने त्यांना बरीच प्रश्नेसुद्धा विचारली होती आणि त्याने काही बदलसुद्धा सुचवले होते.

सुशांतच्या फोन कॉल्स रेकॉर्डमधून याबाबत आणखी माहिती समोर आली. सुशांत एकामागोमाग एक अशा पाच फोन कॉल्सवर जवळपास १२ मिनिटांसाठी बोलत होता. टॅलेंट मॅनेजर गौरी यांच्याशीसुद्धा त्याने ३६८ सेकंद बातचित केली होती.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 8:23 pm

Web Title: sushant singh rajput was discussing scripts day before demise ssv 92
Next Stories
1 नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना करोनाची बाधा, लीलावती रुग्णालयात दाखल
2 सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल, जाणून घ्या विजय मल्ल्या कनेक्शन
3 अखेर स्वप्न पुर्ण झालं; अभिनेत्याने कतरिनासोबत काम करण्यासाठी पाहिली होती वर्षभर वाट
Just Now!
X