बॉलीवूड अभिनेता सुशातं सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये रोज नवी माहिती समोर येत आहे. त्यातच मागील काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत, त्यावरुन सुशांतच्या चाहत्यांना या प्रकरणामध्ये काहीतरी लपवलं जात असल्याची शंका येत आहेत. सध्या ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान समोर आलेल्या नवीन माहितीनुसार सुशांतने आपल्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसाठी कोट्यवधींचा फ्लॅट खरेदी केला होता.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार ईडीने केलेल्या चौकशीत अंकिताबाबत नवी माहिती समोर आली आहे. सुशांतने मालाडमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत तब्बल चार कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. या फ्लॅटचे ईएमआय सुशांत भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहतेय. रिया चक्रवर्तीने केलेल्या दाव्यानुसार सुशांतला हा फ्लॅट रिमाका करायचा होता. परंतु अंकिता हा फ्लॅट सोडण्यास तयार नव्हती. ईडी सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.
#JusticeForSushantSinghRajput #CBIforSSR pic.twitter.com/h2ORNB9UaP
— Ankita lokhande (@anky1912) August 13, 2020
अंकिता लोखंडे सध्या सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी यासाठी सोशल मीडियावर जोरदार आवाज उठवत आहे. अलिकडेच तिने “सुशांतसोबत नेमकं काय घडलं? हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचं आहे. सुशांतची केस CBI कडे सोपवावी. #CBI for SSR” अशा आशयाचं ट्विट देखील केलं होतं.
अंकिता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड होती. सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. दरम्यान त्या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. जवळपास पाच वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. दोघे लग्न करणार अशा चर्चा होत्या. दरम्यान २०१३ मध्ये सुशांतने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्या दोघांचं ब्रेकअप झालं. अंकितासोबत ब्रेकअप केल्यानंतर सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.