06 March 2021

News Flash

‘दिल बेचारा’च्या ट्रेलरमध्ये सुशांतने घातलेल्या टी-शर्टने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष

सध्या सोशल मीडियावर त्याने परिधान केलेला टी-शर्ट चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. पण सध्या सोशल मीडियावर ट्रेलर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

सुशांतने ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये परिधान केलेला टी-शर्ट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्या टी-शर्टवर “HELP!” असे लिहिलेले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सुशांतचा हा टी-शर्ट परिधान केलेला फोटो शेअर करत ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने ‘सुशांत हसत आहे पण त्याच्या टी-शर्टवर help असे लिहिले आहे.’ तर दुसऱ्या एका यूजरने ‘त्याच्या टी-शर्टवर त्याच्या भावना दिसतायेत’ असे म्हटले आहे.

दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर ६ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. तसेच चित्रपट २४ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. मुख्य भूमिका असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. तसेच अभिनेता सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 11:32 am

Web Title: sushant singh rajputs shirt in dil bechara trailer grabs netizens attention avb 95
Next Stories
1 छोट्या पडद्यावरील आणखी एक जोडी होणार विभक्त ; मानिनी डे- मिहिर मिश्रा घेणार घटस्फोट?
2 “होय, आपण त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बांधिल आहोत कारण…”; मनोज वाजपेयीने बॉलिवूडला सुनावलं
3 प्रसाद ओक सांगतोय लॉकडाउनमध्ये उपयुक्त असा सुखी संसाराचा मूलमंत्र
Just Now!
X