News Flash

मोठ्या अपघातून बचावला सुयश टिळक, ‘माणुसकी जिवंत आहे’ म्हणत शेअर केली पोस्ट

अचानक मालवाहतूक गाडी त्याच्या गाडीला येऊन धडकली अन्...

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकच्या गाडीचा अपघात झाला होता. पण या अपघातातून सुयशला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याने सोशल मीडियावर याबाबत माहिती देत ‘माणूसकी जीवंत आहे’ असे म्हटले आहे.

२८ फेब्रुवारीला पहाटे सुयशचा अपघात झाला. तो कॅबने प्रवास करत असताना अचानक एक मालवाहतूक गाडी त्याच्या गाडीला येऊन धडकली. त्यामुळे गाडी रस्त्यावरुन बाहेर फेकली गेली. सुदैवाने कॅब ड्रायव्हर आणि सुयशला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले. त्यानंतर सुयशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

पाहा : ‘हे’ मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा सेल्फी शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. ‘धन्यवाद, माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि आशिर्वादासाठी तुमचे आभार. मी सुरक्षित आहे. काळजी करण्याचे कारण नाही. देवाच्या कृपेने मला मोठी इजा झालेली नाही. माणुसकी अजूनही जिवंत आहे’ या आशयाचे कॅप्शन त्याने फोटो शेअर करत दिल आहे.

२५० कोटींची मालकीण माधुरी दीक्षित राहते मुंबईतील आलिशान बंगल्यात, पाहा फोटो

सुयशने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या का रे दुरावा, दुर्वा, पुढचं पाऊल, बंध रेशामाचे या मालिका अतिशय लोकप्रिय ठरल्या होत्या. तसेच काही दिवसापूर्वी त्याने ‘खालीपीली’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 10:36 am

Web Title: suyash tilak cab accident social media post avb 95
Next Stories
1 Birthday Special : ‘टायगर’ नावाची रंजक कहाणी; जॅकी श्रॉफ की जुबानी
2 ‘नोमॅडलँड’, ‘बोराट २’ला गोल्डन ग्लोब पुरस्कार
3 ‘त्या’ चौघींची गोष्ट लवकरच येणार सर्वांसमोर
Just Now!
X