News Flash

“त्या पीडित तरुणीला न्याय द्या”; हाथरस प्रकरणी स्वरा भास्करचा प्रियंका गांधी यांना पाठिंबा

हाथरस प्रकरणी प्रियंका गांधींचे मोदी सरकारला पाच प्रश्न

हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. हाथरसमधील पीडित तरुणीला न्याय मिळायलाच पाहिजे, अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या या भूमिकेला अभिनेत्री स्वरा भास्कर हिने पाठिंबा दिला आहे. “होय, ती तरुणी न्यायासाठी पात्र आहे बदनामीसाठी नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने देखील सरकारवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “सरकारी पुरस्कार परत करणार होतीस ना?”; रियाची सुटका होताच स्वराने कंगनाला डिवचलं

हाथरस प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीवर हल्लाही झाला तिची जीभ छाटण्यात आली. पीडित मुलीवर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरला उशिरा या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध देशभरातून होतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 2:26 pm

Web Title: swara bhaskar priyanka gandhi hathras gang rape and murder mppg 94
Next Stories
1 ‘सिंगिंग स्टार’च्या मंचावर होणार लोकसंगीताचा जागर
2 करोनाचा फटका ‘डायनॉसॉर’लाही; दोन वर्ष लांबवणीवर पडला ‘हा’ प्रोजेक्ट
3 ‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी रविना टंडनची खास ऑफर; म्हणाली…
Just Now!
X