News Flash

…म्हणून शाहरुखसोबत काम करण्यास स्वराचा नकार

रोखठोक बोलण्यामुळे स्वरा कायम चर्चेत येत असते.

…म्हणून शाहरुखसोबत काम करण्यास स्वराचा नकार
स्वरा भास्कर, शाहरुख खान

‘राज’ असो किंवा ‘राहुल’ प्रत्येक भूमिकेमुळे तरुणींना वेडं करणारा अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत काम करण्याची संधी प्रत्येक अभिनेत्री शोधत असते. मात्र अभिनेत्री स्वरा भास्करने शाहरुखसोबत काम करण्यास चक्क नकार दिल्याचं समोर आलं आहे.

‘रांझणा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘वीरे दी वेडिंग’ यासारख्या चित्रपटातून स्वत:ची ओळख निर्माण करणारी स्वरा तिच्या रोखठोक वक्तव्यामुळे आणि अभिनयामुळे ओळखली जाते. त्यामुळे ती चाहत्यांमध्ये सतत चर्चेचा विषय ठरत असते. यावेळी तिने शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिल्यामुळे चर्चेत आली आहे.

शाहरुखच्या एका नावाजलेल्या चित्रपटासाठी स्वराला विचारणा करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये स्वराला शाहरुखच्या बहिणीची भूमिका वठवायची होती. मात्र बहिणीची भूमिका मिळणार असल्याचं ऐकताच स्वराने स्पष्ट शब्दात नकार दिला.

‘माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी शाहरुख एक आहे. त्यामुळे जर त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली तर मला प्रमुख भूमिका किंवा त्याची अभिनेत्री व्हायला आवडेल. त्याची बहीण होण्याचा विचार मी कधी स्वप्नातही करु शकत नाही. त्यामुळे या चित्रपटात मी बहिणीची भूमिका साकारु शकणार नाही’, असं म्हणत स्वराने या चित्रपट झळकण्यास नकार दिला.

दरम्यान, शाहरुखची लोकप्रियता प्रचंड असून चाहत्यांप्रमाणेच अभिनेत्रीही त्याच्या प्रेमात वेड्या आहेत. काही दिवसापूर्वी अभिनेत्री फातिमा सना शेखनेही असंच एक वक्तव्य केलं होते. शाहरुखचं लग्न झाल्याचं समजताच मी प्रचंड रडले होते असं सना म्हणाली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 1:07 pm

Web Title: swara bhaskar refuses to play shahrukh khans film
Next Stories
1 ‘ठंड तो नहीं लग रही?’; दीप-वीरच्या रिसेप्शनवर गमतीशीर मीम्स व्हायरल
2 ‘इफ्फी’त आईच्या आठवणीने जान्हवी भावूक
3 प्रदर्शनापूर्वी २.0 नं कमावले ३७० कोटी !
Just Now!
X