दिल्ली विधानसभेच्या एका समितीनं द्वेषमूलक मजकूरप्रकरणी फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना समन्स बजावले असून १५ सप्टेंबरला समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया मंच या संघटनेकडून देशात द्वेषमूलक मजकूराचे प्रसारण रोखण्यात फेसबुककडून आवश्यक पावलं न उचलल्याबद्दलच्या तक्रारींवरुन समितीनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुक इंडियाला कसली भीती वाटतेय? असा सवाल तिने केला आहे.

अवश्य पाहा – “इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी अनुरागने मला खोलीत बोलावलं”, अन्…; अभिनेत्रीचा खुलासा

“दिल्ली विधानसभेच्या शांतात आणि सौहार्द समितीपासून वाचण्यासाठी अजित मोहन सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतायेत का? फेसबुक इंडियाला कसली भीती वाटतेय? लोक तुम्हाला फक्त योग्य प्रश्न विचारतायेत.” अशा आशयाचं ट्विट स्वरा भास्कर हिने केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या ट्विटमध्ये तिने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील टॅग केलं आहे.

समितीनं शनिवारी निवेदनाद्वारे म्हटलं की, “हे समन्स प्रमुख साक्षीदारांनी दिलेला जबाब आणि त्यांनी नोंदवलेली आक्षेपार्ह माहिती सादर केल्यानंतर बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” दिल्ली विधानसभेच्या शांतात आणि सौहार्द समितीद्वारे हे समन्स वॉलस्ट्रीट जर्नलच्या त्या बातमीनंतर बजावण्यात आले आहे. ज्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे की, फेसबुकच्या भारतातील अधिकाऱ्याने तेलंगणातील भाजपाच्या एका नेत्यावर बंदी घालण्यापासून रोखले होते. या भाजापा नेत्यानं कथित स्वरुपात जातीयवादी आणि चिथावणी देणारी पोस्ट शेअर केली होती.