News Flash

समांतर 2 मधील ‘ती बाई’ कोण असेल?; स्वप्नील जोशीच्या ट्विटने वाढवली उत्सुकता

आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय, हे जाणून घेणं कुणाला नकोसं असतं?

आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय, हे जाणून घेणं कुणाला नकोसं असतं? भविष्यात डोकावणं प्रत्येकालाच आवडत असतं. वर्तमानपत्रात दर आठवडय़ाला छापून येणारं साप्ताहिक राशीभविष्य असो की, दाराशी आलेला एखादा बाबाबुवा असो आपलं पुढचं आयुष्य कसं असेल, हे जाणण्याची उत्सुकता शमत नाही. पण समजा, एखाद्याच्या समोर त्याचा भविष्यकाळ प्रत्यक्ष कुणी जगत असेल तर..? एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेला ‘समांतर’ याच कहाणीभोवती फिरतो. स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज यांची मुख्य भूमिका असलेली ही सीरिज प्रेक्षक-समीक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्वप्निल जोशीने ट्विटरवर समांतर २ विषयी एक प्रश्न नेटकऱ्यांना विचारला आहे. ‘समांतर २ मधील ती बाई… कुठल्या अभिनेत्रीला बघायला आवडेल? रिप्लायमध्ये तुमच्या मनातलं कास्टिंग सांगा’, असा प्रश्न स्वप्निलने नेटकऱ्यांना विचारला. नेटकऱ्यांनी सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, वैदेही परशुरामी, नेहा महाजन, अपूर्वा नेमळेकर अशी अनेक नावं सुचवली आहेत. आता ती बाई कोण साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘समांतर’च्या शेवटच्या भागात तेजस्विनी पंडित जिने स्वप्निल जोशी अर्थात कुमार महाजनच्या बायकोची भूमिका साकारली आहे तिच्या व्यतिरिक्त आणखी ‘एका बाई’ची एण्ट्री होते. तर ही बाई कोण असेल अशी उत्कंठा चाहत्यांना लागून राहिली आहे.

सुहास शिरवळकर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित ही मराठी वेब सीरिज सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली आहे. नऊ भागांची ही वेब सीरिज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 5:35 pm

Web Title: swwapnil joshi tweet about his web series samantar 2 ssv 92
Next Stories
1 तापसी-कंगना वादाला अखेर पूर्णविराम; अभिनेत्रीने घेतली माघार
2 Video : वयाच्या २७व्या वर्षी बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये पोहोचलेल्या दिग्दर्शकाचा प्रवास
3 भालेराव कुटुंब येतंय तुमच्या भेटीला
Just Now!
X