News Flash

Teaser : ‘इतिहास हमसे लिखा जाएगा’; चिरंजीवी व बिग बी यांचा बिग बजेट चित्रपट

टीझरमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला आहे

स्ये रा नरसिम्हा रेड्डी

ऐतिहासिक कथानकारवर आधारित ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जवळपास २०० कोटींच्या आसपास बजेट असलेल्या या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण करत असून काही वेळापूर्वीच प्रदर्शित झालेला टीझर सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्ड होताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजात या टीझरची सुरुवात होत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला आहे. इंग्रजांसोबत लढा देणारा नरसिम्हा हा या टीझरमधून प्रत्येकाच लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी नरसिम्हा रेड्डी यांच्या गुरुची भूमिका साकारली आहे. या टीझरमध्ये चिरंजीवीसोबत अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, तमन्ना भाटिया हे कलाकार पाहायला मिळत आहेत.

वाचा : अपयशी ठरत असल्यामुळे निर्मात्याने मागितली होती जन्मपत्रिका – विद्या बालन

दरम्यान, हा चित्रपट कुरनूल येथे राहणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित असून चिरंजीवी यात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर सुदीप याने अवुकू राजू हे व्यक्तीरेखा साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 3:52 pm

Web Title: sye raa narasimha reddy teaser released ssj 93
Next Stories
1 ‘सेक्रेड गेम्स२’मुळे या व्यक्तीच्या डोक्याला झालाय ताप; ‘नेटफ्लिक्स’नेही मागितली माफी
2 अभिनेत्यासोबत लीप लॉक सीनमुळे चर्चेत आला होता रणदीप हुड्डा
3 Video : बिग बॉसच्या घरातील नेहाचा ‘मुंगळा’ डान्स होतोय व्हायरल
Just Now!
X