शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये स्वकर्तृत्वाच्या बळावर स्वत:च नाव अजरामर करणारा एक लढवैय्या म्हणजे तानाजी मालुसरे. शिवाजी महाराजांच्या या करारी योद्ध्याची कथा लवकरच रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. तानाजींच्या पराक्रमाची कथा अभिनेता अजय देवगण चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपट २७ डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल केल्यामुळे प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाविषयी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अजय यामध्ये तानाजींची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर सलमान खान शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट २७ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श आणि अजय देवगण यांनी ही माहिती दिली.

१५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याची चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी अभिनेता अजिंक्य देव एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. मात्र ते कोणती भूमिका वठविणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराज आणि त्यांच्या निर्भीड मावळ्यांच्या पराक्रमांच्या गाथा जिवंत केल्या जाणार आहेत. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढण्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चित्रपटाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taanaji the unsung warrior ajay devgn kajol movie date
First published on: 24-03-2019 at 13:33 IST