News Flash

Video : तापसीने पहिल्यांदाच पोस्ट केला बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ

'बिगिनी शूट' या व्हायरल गाण्यावर तापसी, तिच्या बहिणी व बॉयफ्रेंड मॅथिस यांनी मिळून भन्नाट व्हिडीओ शूट केला आहे.

दमदार अभिनय व बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या बहिणींसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. बहीण शगुन आणि चुलत बहीण इवानियासोबतच तापसीचा बॉयफ्रेंड मॅथिस बोसुद्धा सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. मालदीवमधले सुंदर फोटो पोस्ट करत असतानाच तापसीने पहिल्यांदाच बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘बिगिनी शूट’ या व्हायरल गाण्यावर तापसी, तिच्या बहिणी व बॉयफ्रेंड मॅथिस यांनी मिळून भन्नाट व्हिडीओ शूट केला आहे.

सोमवारी तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला. यशराज मुखाटेच्या ‘बिगिनी शूट’ या गाण्यावर तापसी, तिच्या दोन बहिणी व बॉयफ्रेंड मॅथिस थिरकताना दिसत आहेत. ‘बिगिनी शूट’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर अनेकांनी भन्नाट व्हिडीओ केले आहेत. यशराज मुखाटेचा याआधी ‘रसोडे में कौन था’ हा रॅप साँगसुद्धा व्हायरल झाला होता.

तापसीचा बॉयफ्रेंड मॅथिस हा बॅडमिंटनपटू असून गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. मात्र तापसीने तिचं खासगी आयुष्य कधीच माध्यमांसमोर येऊ दिलं नाही. “मला कोणापासून काही लपवायचे नाहीये. माझ्या आयुष्यात ती खास व्यक्ती आहे याचा मला फार आनंद आहे. पण त्याचवेळी या गोष्टी मी फक्त हेडलाइन्ससाठी सांगणार नाही,” असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 9:39 am

Web Title: taapsee pannu makes hilarious video on viral biggini shoot song boyfriend mathias boe makes cameo ssv 92
Next Stories
1 आयपीएलसाठी तैमूर सज्ज! करीनाने फोटो शेअर करत विचारला प्रश्न
2 बिग बींसाठी प्रसिद्ध गायकानं १७ तास उपाशी राहून गायलं होतं गाणं
3 प्रभासने पूजा हेगडेला वाढदिवशी दिले खास गिफ्ट
Just Now!
X