अभिनेत्री तापसी पन्नू व दिग्दर्शक सुजॉय घोष हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ‘बदला’ चित्रपटासाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. मात्र आता एका कारणावरून तापसी सुजॉय घोष यांच्यावर चांगलीच संतापली आहे. ‘मदर्स डे’निमित्त सुजॉय यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो तापसीला रुचला नाही. म्हणून तिने ट्विटरवर तिचा राग व्यक्त केला.

सुजॉय यांनी त्यांच्या चित्रपटात आईची भूमिका साकारणाऱ्या विद्या बालन, अमृता सिंह यांचा फोटो पोस्ट करत ‘तुमची आई ही देवाचा अवतार आहे’ असं म्हटलं. या फोटोवर नाराजी व्यक्त करत तापसी म्हणाली, ‘यात माझा फोटो कुठे आहे? मीसुद्धा आईची भूमिका साकारली होती.’ यावर सुजॉय यांनी मस्करीत तिला रिप्लाय दिला की, ‘तुझा फोटो बनवायला दिला आहे.’ सुजॉय यांच्या या मस्करीचा तापसीला चांगलाच राग आला.

आणखी वाचा : जेव्हा शाहरुखवर इरफान खान झाला होता नाराज; पुरस्कार सोहळ्यातून निघून जाण्याची केली होती तयारी

‘मला म्हणावं लागेल की हे चुकीचं आहे. एकतर मी तुमच्या चित्रपटात आईची भूमिका साकारण्यासाठी तयार झाले आणि तुम्ही माझा फोटोसुद्धा पोस्ट केला नाही. आता तुम्ही पुढची स्क्रीप्ट पूर्ण करेपर्यंत पाहा काय होतंय? आणि खबरदार जर तुम्ही मला पुन्हा आईची भूमिका साकारायला सांगितली तर..’ सुजॉयने तापसीच्या या ट्विटचं उत्तरही मजेशीर अंदाजात दिलं. ‘नाहीतर थप्पड का?’, असं म्हणत त्यांनी तापसीची थट्टामस्करी केली.

सुजॉय घोष यांच्या ‘बदला’ या चित्रपटात तापसीने आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं फार कौतुक करण्यात आलं होतं.