13 August 2020

News Flash

कनिकाच्या निष्काळजीपणावर तापसी म्हणाली…

एक मुलाखतीमध्ये तापसीने तिचे मत मांडले आहे.

लंडनहून भारतात येताच गायिका कनिका कपूर चर्चेत आहे. या चर्चांना तिची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे उधाण मिळाले आहे. पण कनिकाने तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे सर्वांपासून लपवल्याचे आरोप अनेकांनी तिच्यावर केले. सोशल मीडियावर कनिकावर जोरदार टीका करण्यात आली. आता बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने कनिकाच्या निष्काळजीपणावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच तापसीने झूम टीव्हीला मुलाखत दिली. यामध्ये तिला कनिकाशी संबंधीत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने, ‘ही खूप वाईट गोष्ट आहे. जर तिला करोना झाल्याचे माहितीच नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण जर तिला माहित असताना देखील ती लोकांच्या संपर्कात येत होती तर मग हे निराशाजनक आहे’ असे तापसी म्हणाली.

‘विमानतळावर ती करोना चाचणीसाठी गेली असल्याचे कनिकाने म्हटले. पण काही कारणामुळे तिची चाचणी झाली नाही. जर तिला स्वत:ला करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत होती तर तिने स्वत:चे विलगीकरण करुन घ्यायला हवे होते. मला असे वाटते की दोघांचीही जबाबदारी होती’ असे तापसी पुढे म्हणाली आहे.

कनिका आपल्या मुलांना भेटून लंडहून भारतात परतल्याचे म्हटले जाते. त्यानंतर ती अनेक पार्ट्यांमध्ये सहभागी झाली. जवळपास ३५० ते ४०० लोकांच्या संपर्कात आली. काही दिवसांनंतर कनिकाची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच कनिका थांबलेले संपूर्ण हॉटेल खाली करण्यात आले आहे. आता सध्या कनिकावर लखनऊमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 10:43 am

Web Title: taapsee pannu talks about kanika kapoor avb 95
Next Stories
1 Fact check : लंडनमध्ये कनिकाला भेटल्याने प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण? जाणून घ्या सत्य
2 Coronavirus : लॉकडाउनमध्ये एकटं राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं काय? दिया मिर्झाने व्यक्त केली चिंता
3 चित्रपट नाटकांचे शीर्षक संदेशरुपातून
Just Now!
X