02 July 2020

News Flash

तापसी पन्नूला हवा आहे ‘या’ अभिनेत्यासोबत सेल्फी; कारण वाचून व्हाल थक्क…

तापसी पन्नू 'या' अभिनेत्यामुळे आहे चर्चेत

अभिनेत्री तापसी पन्नू अत्यंत प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात अनोख्या व्यक्तिरेखा साकारताना दिसते. तिचा ‘थप्पड’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तापसीने अभिनेता हृतिक रोशनबाबत आश्चर्यचकित करणारे वक्तव्य केले.

काय म्हणाली तापसी?

हृतिक रोशन हा तापसीचा सर्वात आवडता अभिनेता आहे. तिला त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा आहे. अभिनेत्री दिया मिर्झाच्या वाढदिवसाच्या पार्टीत पहिल्यांदाच दोघांची भेट झाली होती. परंतु त्यावेळी तिला हृतिकसोबत सेल्फी घेण्याची संधी मिळाली नाही. मात्र येत्या काळात ती हृतिकसोबत सेल्फी मिळवणार आहे. शिवाय त्याच्या चित्रपटात काम देण्याची विनंती देखील करणार आहे. अशा शब्दात तापसीने हृतिकची स्तुती करत असताना आपल्या आगामी प्रकल्पाची माहिती दिली.

हैदराबाद एन्काऊंटनंतर तापसी म्हणाली..

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार झाले आहेत. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पोलिसांनी बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यावर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येत असताना अभिनेत्री तापसी पन्नूने एन्काऊंटवर आश्चर्य व्यक्त केला.

“आपल्या समाजातील मूळ समस्येवर आधी बोलुयात. आपल्या मुलांना आपण कशाप्रकारे घडवतो हे या सर्व गोष्टींचं सार आहे. एखादी वाईट किंवा चुकीची गोष्ट करू नये हे लहानपणापासूनच आपल्या मुलांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. भीतीमुळे नाही तर आपल्या नैतिक मुल्यांच्या विरोधात त्या गोष्टी असल्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. मी माझ्या मुलाला असंच घडवेन. आपण एखाद्यावर आरोप करू शकतो पण आपल्या मुलांना चांगल्याप्रकारे घडवणं हेच आपल्या हातात आहे. हैदराबाद एन्काऊंटरबद्दल समजल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. पोलीस इतक्या टोकाची भूमिका घेतात असं आपण कधी ऐकलं नव्हतं”, असं तापसी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’ या कार्यक्रमात म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:59 pm

Web Title: taapsee pannu wants selfie with hrithik roshan mppg 94
Next Stories
1 ‘नशीब ते जिवंत तरी आहेत’; दिल्ली हिंसाचारावरुन अभिनेत्रीचा क्रेंद्र सरकारवर टोला
2 Video: शंकर महादेवन यांनाही आवरला नाही वासुदेवाचं गाणं ऐकण्याचा मोह
3 प्रविण तरडेंच्या ‘या’ चित्रपटाचा सलमान करणार रिमेक, साकारणार ही भूमिका?
Just Now!
X