18 November 2017

News Flash

ट्रोलिंग करणाऱ्यांना तापसी म्हणते..

फ्लोरल बिकनीतील काही फोटो तिने शेअर केले होते.

मुंबई | Updated: September 14, 2017 10:17 AM

तापसी पन्नू

‘पिंक’ आणि ‘नाम शबाना’ या चित्रपटांमध्ये सक्षम भूमिका साकारणाऱ्या तापसी पन्नूने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यश मिळवले. ही ३० वर्षीय अभिनेत्री आता डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘जुडवा २’ या चित्रपटात वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासह झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या या चित्रपटाची जोरात प्रसिद्धी सुरु असून, त्यावेळी तापसीने तिचे बीचवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

फ्लोरल बिकनीतील काही फोटो तिने शेअर केले. ‘जेव्हा तुम्ही लाटांच्या विरुद्ध दिशेला असता, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच ताठ उभं राहण्याची गरज असते…. पण त्यावेळी चेहऱ्यावर हसू आणायला विसरू नका.’ या कॅप्शनला तिने #Judwaa2 #AaTohSahi हे हॅशटॅगही दिले.

वाचा : संजय दत्तने पूर्ण केली वडिलांची शेवटची इच्छा

तापसीने हे फोटो ट्विटरवर शेअर करताच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. फोटोंवर आलेल्या संमिश्र प्रतिक्रियांमध्ये काहींनी तिची प्रशंसा केली, तर काहींनी बिकिनीतील फोटोंसाठी तिला फटकारले. त्यातील एका नेटिझनने अगदी वाईट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘कम से कम सोशल मीडियापे ऐसी गंदी फोटो मत अपलोड करीए, गंदी गंदी फिल्मे बना के देश की युवा पिढी को तो बरबाद कर रहे है आपलोग….’. असे त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते.

वाचा : ‘या’ अभिनेत्रीमुळे अक्षय कुमार त्रस्त

या प्रतिक्रियेवर चिडलेल्या तापसीने सडेतोड उत्तर देण्याचे ठरवले. त्या ट्विटला रिट्विट करत तिने लिहिलं की, ‘गंदी???? माझ्या अंगावर असलेली वाळू मी साफ करायला हवी होती, हे मला माहितीये. पुढच्या वेळी मी याची काळजी घेईन. ‘आपलोग’ म्हणणाऱ्यांसाठी.’

First Published on September 14, 2017 10:17 am

Web Title: taapsee pannus sassy reply to a troll for her beach look