छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकीच गाजलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अमित भट्ट. मालिकेत त्यांनी चंपकलाल गडा उर्फ बापूजी ही भूमिका साकारली आहे. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी ‘गुपचूप गुपचूप’, ‘चेहरे पर माहोरू’ यांसारख्या स्टेज शोमध्ये काम केलंय. मारत ‘तारक मेहता..’मधील बापूजींच्या भूमिकेने त्यांना एक वेगळीच ओळख व प्रसिद्धी मिळाली आहे.

अमित भट्ट यांनी कृती भट्टशी लग्न केलं असून त्यांना जुळी मुलं आहेत. ‘तारक मेहता..’मध्ये जरी ते वयोवृद्ध वाटत असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांचं वय ४७ वर्षे आहे. विशेष म्हणजे ऑनस्क्रीन त्यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या जेठालाल अर्थात दिलीप जोशीपेक्षा ते एक वर्षाने लहानच आहेत. ‘iwmbuzz’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अमित यांना एका एपिसोडसाठी ५० ते ६० हजार रुपये मिळतात.

आणखी वाचा : तुमच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीवर राज्य करणाऱ्या १० ‘वेब क्वीन’

मालिकेमध्ये सतत चिडचिड करणारे बापूजी म्हणजेच अमित हे खऱ्या आयुष्यात अत्यंत वेगळे आहेत. पडद्यामागे सतत हसतमुख राहणाऱ्या अमित यांना फिरण्याची आणि गाण्यांची विशेष आवड आहे. यापूर्वी त्यांनी ‘खिचडी’ आणि ‘एफआयआर’ मालिकेतही काम केलं आहे.