छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची वेगळी अशी ओळख आहे. मालिकेत बबिता हे पात्र साकारणारी मुनमुन दत्ता ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकताच तिने टप्पू म्हणजे जेठालालच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकटच्या व्हिडीओवर कमेंट केल्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत.

राजने काही दिवसांपूर्वी त्याचा यूट्यूब चॅनेल सुरु केला आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे. दरम्यान मुनमुन दत्ताने या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

वाचा सविस्तर: आठ वर्षे टप्पूची भूमिका साकारणारा भव्य आहे पत्रकार, जाणून घ्या सध्या काय करतो

 

View this post on Instagram

 

A post shared by (@mmoonstar)

वाचा सविस्तर: चंपकलालपेक्षाही जेठालालचे मानधन जास्त?, जाणून घ्या ‘तारक मेहता..’मधील कलाकारांचे मानधन

‘मस्तच.. बरं किती पैसे कमावतोस?’ या आशयाची कमेंट मुनमुनने केली होती. तिच्या या प्रश्नावर राजने अद्याप उत्तर दिलेले नाही. पण राज यावर काय उत्तर देणार हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.