News Flash

‘तारक मेहता…’मधील सोनूने शेअर केलेला फोटो पुन्हा चर्चेत, चाहते म्हणाले…

पाहा तिने शेअर केलेला फोटो..

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असते. गेल्या १२ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या मालिकेत सोनू हे पात्र झील मेहताने साकारले होते. पण झीलने काही कारणास्तव मालिका सोडली. झील सध्या मालिकेत दिसत नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर होता आता हा फोटो पुन्हा एकदा चर्चेत आहे.

झील मेहताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील एक फोटो तिच्या लहानपणीचा आहे आणि एक फोटो आताचा आहे. दोन्ही फोटोंमध्ये ताज महलसमोर उभी असल्याचे दिसत आहे. हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

झीलने शेअर केलेला हा फोटो जूना आहे. पण आता पुन्हा एकदा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत आधी कशी दिसत होती आणि आता कशी दिसते असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 6:17 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah purani sonu aka jheel mehta shares her throwback photo avb 95
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे शक्तिमानमधील गीताला आले होते बदलण्यात, १५ वर्षांनंतर मुकेश खन्नांनी केला खुलासा
2 डॉक्टर डॉन मालिकेत सागर कारंडेची एण्ट्री
3 एजाज-पवित्रा बिग बॉसमुळे आले एकत्र, सीझन संपायच्या आत सुरु झाली लग्नाची तयारी?
Just Now!
X