बॉलिवूडमध्ये चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरणाऱ्या स्टारकिडमध्ये सैफ- करिनाचा लाडका लेक तैमुर अली खान हा कायमच आघाडीवर असतो. अभिनेत्यांपेक्षा हे स्टार कीड अनेकदा जास्त लोकप्रियता मिळवतात. तैमुरचे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो आणि व्हिडियो अनेकदा सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखे पसरतात. त्याचा गोंडस चेहरा आणि करिना कपूर आणि सैफ अली खान यांचे चाहते यामुळे त्याला कमी काळात मोठी पसंतीही मिळते. नुकताच तैमुरचा असाच एक व्हिडियो व्हायरल झाला असून त्यामध्ये तो बॉलसोबत खेळताना दिसत आहे.

एका मैदानात तैमुर बॉलशी खेळताना या व्हिडियोमध्ये दिसत आहे. लहान मुलं ज्याप्रमाणे बॉल टाकून त्यामागे पळतात त्याचप्रमाणे तैमुरही बॉलमागे दुडूदुडू पळताना आणि पुन्हा फेकलेला बॉल आणताना दिसत आहे. हिरव्या रंगाचा टीशर्ट आणि पांढरी हाफ पँट घातलेला तैमुर यात अतिशय गोंडस दिसत आहे. हा व्हिडियो इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याला नेटीझन्सची पसंती मिळताना दिसत आहे. याच व्हिडियोमध्ये बाजूला लोक बॅडमिंटन खेळत असल्याचे दिसत आहे.

याबरोबरच सैफसोबतचा त्याचा आणखी एक व्हिडियो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये तो आणि सैफ अली खान एका कठड्यावर बसून बाकी लोक खेळत असलेले बॅडमिंटन पाहताना दिसत आहेत. एरवी आपल्या शूटींग शेड्यूलमध्ये बिझी असणारा सैफ आपल्या चिमुकल्याला पुरेसा वेळ मिळेल याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असावा. बाकी काहीही असो पण चिमुकला तैमुर मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आणि गोंडसपणामुळे वाहवा मिळविण्यात यशस्वी ठरत आहे हे नक्की.